नाहीतर कफनची व्यवस्था कर , जितेंद्र आव्हाड यांना फोनवर धमकी 

शेअर करा

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण लॉरेन्स बिश्नोई याचे नाव समोर आल्यानंतर असाच प्रकार आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत घडलेला आहे . ‘ दोन लाखांची खंडणी दे नाहीतर कफनची व्यवस्था कर ‘ अशी धमकी जितेंद्र आव्हाड यांना सोमवारी देण्यात आलेली आहे. 

आव्हाड यांच्या खाजगी क्रमांकावर हा फोन आला आणि त्यामध्ये समोरील व्यक्तीने अशा स्वरूपाची धमकी दिली. लॉरेन्स बिश्नोई याचा शार्पशुटर आहे असे सांगत समोरील व्यक्तीने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्याचे नाव रोहित गोदारा असे असल्याचे सांगितले . माझ्याच सांगण्यावरून सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला असा देखील दावा त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी गोदारा हा राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामडी यांच्या खून प्रकरणातील आरोपी असल्याची देखील माहिती दिलेली आहे.


शेअर करा