नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडणं पडलं महागात,  संतप्त झालेल्या जावयाने.. 

शेअर करा

नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडू नये असे म्हटले जाते मात्र अनेकदा नाते आणि मायेपोटी हा प्रकार होतो आणि त्यातून वाद आणखीनच चिघळतो असाच एक प्रकार राहुरीत समोर आलेला असून नवरा बायकोला मारहाण करत असताना मुलीला जावयाच्या तावडीतून वाचवण्यासाठी म्हणून मध्ये पडलेल्या सासूलाच जावयाने मारहाण केलेली आहे. . 

उपलब्ध माहितीनुसार , बारागाव नांदूर इथे ही घटना 22 तारखेला घडलेली असून आरोपी जावयाच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

योगेश साळवे असे या जावयाचे नाव असून तो बारागाव नांदूर येथे त्याच्या पत्नी सोबत राहतो. सासू असलेल्या रोहिणी रोहिदास सातपुते ( वय ४० वर्ष राहणार राहुरी ) या 22 तारखेला दुपारी मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी आरोपी हा त्याच्या बायकोला अर्थात फिर्यादीच्या मुलीला मारहाण करत होता. रोहिणी सातपुते मध्ये पडल्या त्यावेळी आरोपीने त्यांनाही मारहाण केली त्यानंतर जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा