आज होणार सुजय विखे यांचा अर्ज दाखल , कोण कोण राहणार उपस्थित ? 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी  पुणेवाडी इथे बोलताना , ‘ विखे कुटुंबातील सर्व सदस्यांनी शैक्षणिक आरोग्य सहकार आणि सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर काम केलेले आहे मात्र त्याची कधी जाहिरात केली नाही. विळद घाट येथील आमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले मात्र त्याचे कधी व्हिडिओ आम्ही बनवलेले नाहीत. विरोधक नाटकीपणा करतात मी कधी नाटकीपणा केलेला नाही , ‘ असे म्हटलेले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना दोन्ही उमेदवारांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. सुजय विखे म्हणाले की , ‘ पारनेरमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर संवाद मेळाव्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गावांमध्ये जाण्याचा संपर्क आला. सर्वच नागरिकांचा आपल्याला अभूतपूर्व असा पाठिंबा मिळत आहे. ‘. 

सुजय विखे हे 22 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील . 


शेअर करा