सुजय विखे यांच्यासाठी महायुतीचे मोठं शक्तिप्रदर्शन , बॉस अन पर्मनंट खासदारांचे बोर्ड

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर खासदार सुजय विखे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरतेवेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलेले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज तारीख असल्याकारणाने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली होती. 

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा दिसून येत होता तर सुजय विखे यांच्या समर्थनार्थ महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. सुजय विखे यांच्या समर्थनार्थ आलेल्या अनेक जणांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले , आमदार संग्राम जगताप सोबत योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो तसेच टोप्या घातलेल्या होत्या तर अनेक जणांच्या हातात भाजपचे झेंडे आढळून आले. सुजय विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांना देखील त्यांच्या समर्थकांनी उचलून घेत मोठ्या प्रमाणात आज शक्ती प्रदर्शन केले आहे . 

सुजय विखे यांच्या प्रचाराचा देखील यावेळी शुभारंभ करण्यात आलेला असून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार श्रीमती मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदींसह भाजपचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 


शेअर करा