उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेली अल्पवयीन मुलगी गायब,  नगरमधील घटना

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून उन्हाळी सुट्टी निमित्त मावशीकडे आलेल्या 17 वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेलेले आहे. कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागातील ही घटना आहे. कोतवाली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

मुलीच्या मावशीने या प्रकरणी गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून सुट्टी निमित्त मुलगी मावशीकडे आलेली होती. 3 एप्रिल रोजी रात्री अचानकपणे ती घरातून गायब झाली होती. तिच्या सर्व नातेवाईकांकडे कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. 


शेअर करा