विवाहितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी , एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल 

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि महिलेने विरोध केला त्यानंतर पीडित महिलेला शिवीगाळ करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. महिलेने पोलिसात दाखल होत दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून विशेष म्हणजे आरोपींमध्ये एक महिलेचा समावेश आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , फकीरा उर्फ करण रामदत्त शर्मा ( वय 35 वर्ष राहणार धानोरी ) आणि सरिता गुड्डू पॉल ( वय तीस वर्ष ) अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत. 

फकीरा याने डिसेंबर 2023 मध्ये पीडित महिलेसोबत मैत्री केली होती आणि त्यानंतर विमाननगर परिसरातील एका लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले . सरिता हिने महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील तिला धमकी दिली होती त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले. 


शेअर करा