उत्कर्षाताई रुपवते यांच्या पाठीमागे ‘ अदृश्य शक्ती ? ‘, दोन्ही आजी-माजी खासदारांवर ताईंचा निशाणा 

शेअर करा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे‌. ‌मतदारसंघातील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे. ‌या मतदारांच्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, शिर्डी लोकसभा निवडणूक ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षाताई रुपवते यांनी म्हटले आहे. 

उत्कर्षाताई रुपवते म्हणाल्या की ? 

दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले आहे, हे जनतेसमोर आहे. काँग्रेसमध्ये आमच्या तीन पिढ्या गेल्यात. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत नक्कीच काही चुका झाल्यात. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसने आपल्या वाट्याला घ्यायला पाहिजे होती. पण कॉंग्रेसचा रेटा कमी पडला असे मला वाटते. 

निवडणुकीत चिन्हाबद्दल चिंता नाही. माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही फक्त जनतेची ताकद सोबत आहे. त्याच पाठबळावर मला लढायचे आहे. दोन्ही निष्क्रिय आजी-माजी खासदारांचा इतिहास बघता माझ्या हितचिंतकांनी “ना आजी, ना माजी, उत्कर्षाताई मारणार बाजी” ही टॅग लाईन तयार केली आहे. नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतरचे लोकांचे प्रेम बघता जनता जनार्दन नक्कीच मला साथ देईल . 

महिलाच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी मी काम करणार आहे. सोबतच युवक, शेतकरी, मतदारसंघातील अन्य प्रश्नांसाठी पुढील काळात काम करणार आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले हे जनतेने पाहिले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा. स्वतः 10 वर्षे किती पक्ष फिरून आलेत, हे बघावे. वंचित भाजपची बी टीम आहे हे आरोप धांदल खोटे आहेत. 


शेअर करा