आरएसएसची गरज संपल्यासारखे मोदींचे वर्तन,  कोणी केली खरमरीत टीका ? 

शेअर करा

‘ पंतप्रधान मोदी सातत्याने बोलताना गॅरंटी शब्दाचा वापर करतात वास्तविक त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? . त्यांची ही गॅरंटी हा खोटारडेपणा आहे ‘ अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. 

हिंगोली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर चव्हाण यांच्या प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ,’ ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा ह्या वसुलीसाठी वापरल्या जात असून आतापर्यंत 16000 कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. दिल्लीत शेतकरी शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी कायदा करण्याची गरज व्यक्त करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेत झाल्यापासून रोखले पाहिजे.’ 

प्रकाश आंबेडकर यांनी संघ आणि भाजप यांच्यातील संबंधावर देखील भाष्य केलेले असून, ‘ सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना देखील भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही. संघाची गरज संपल्यासारखे मोदी वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना भाजपने फसवले आहे . असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा