राहत्या घरात होत होती गांजाची विक्री , कोतवाली पोलिसांना समजलं अन.. 

शेअर करा

राहत्या घरात गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पकडलेले असून शहरातील ख्रिस्तगल्ली भागात ही कारवाई करण्यात आली. कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मतीन बशीर शेख असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत आहे अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली होती. 

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्त गल्ली भागातील आरोपाच्या घरावर छापा टाकला त्यावेळी घरामध्ये गांजा आढळून आला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिलेली असून सुमारे आठ किलो  660 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला असून कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


शेअर करा