नवरा बायकोचा वाद , मिटवायला गेले अन मारामारी करून आले

शेअर करा

नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडू नये असे म्हटले जाते याच म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नगर शहराजवळील पिंपळगाव माळवी इथे घडलेली असून नवरा बायकोचे भांडण मिटवण्यासाठी केलेल्या व्यक्तींनाच मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पूजा प्रशांत पवार ( वय 27 राहणार पिंपळगाव माळवी ) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीनंतर सुमारे सात जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

फिर्यादी पूजा आणि त्यांचे पती प्रशांत यांच्यात वाद असून गेल्या एक महिन्यांपासून पूजा माहेरी राहायला आलेल्या होत्या. भांडण मिटवण्यासाठी मंगळवारी त्यांना फोन आला म्हणून त्या त्यांच्या भावांना घेऊन पिंपळगाव माळवी इथे गेल्या त्यावेळी वाद झाल्याने मारामारीचा प्रकार घडला. 

नामदेव लक्ष्मण चांदणे , निलेश नामदेव चांदणे , राजू बबन पवार , किशोर बबन पवार , प्रशांत बबन पवार , आशाबाई बबन पवार , अश्विनी राजू पवार ( सर्वजण राहणार पिंपळगाव माळवी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 


शेअर करा