‘ ए  चलना ‘ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग , अज्ञात आरोपीचा शोध सुरु

शेअर करा

नगर शहरात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एक अल्पवयीन मुलगी खाजगी क्लाससाठी चाललेली असताना कारमधून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग करत दोन वेळा तिची छेड काढलेली आहे .पीडित मुलीने त्यानंतर कोतवाली पोलिसात फिर्याद दिली असून अनोळखी व्यक्तीचा शोध सध्या सुरू आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बुधवारी 24 तारखेला सकाळी नऊच्या सुमारास ही मुलगी क्लाससाठी पायी चाललेली होती त्यावेळी काळ्या रंगाच्या कार क्रमांक नऊ मधून अनोळखी व्यक्तीने हॉर्न वाजवत ‘ ए  चलना ‘ असे म्हणून तिचा विनयभंग केला. 

सव्वा अकराच्या सुमारास क्लास सुटल्यावर ती पुन्हा ती घरी निघालेली होती त्यावेळी देखील हा व्यक्ती तिथे आला आणि तशाच पद्धतीने त्याने तिला हॉर्न वाजवत तिची छेड काढली. पीडित मुलीने यानंतर कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे.


शेअर करा