निलेश लंकेच्या ‘ तुतारी ‘ साठी कालचा दिवस ऐतिहासिक , एमआयएमची माघार तर.. 

शेअर करा

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्यासाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला असून एमआयएमचे उमेदवार परवेज अशरफी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर निलेश साहेबराव लंके नावाच्या व्यक्तीने देखील त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे संपूर्ण नाव निलेश ज्ञानदेव लंके असे असून त्यांचे चिन्ह तुतारी हे आहे मात्र निलेश साहेबराव लंके एक नावाच्या एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नावाच्या साधर्म्यामुळे लंके यांच्या मतांना धक्का पोहोचला असता तो धोका आता टळलेला आहे.

एमआयएमचे उमेदवार परवेज अशरफी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे मोठ्या प्रमाणात समाजातील विरोध हेच असून एमआयएमची मते विभागून अनेकदा त्याचा भाजपलाच फायदा होतो त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभेच राहू नका असा समाजाचा इशारा कामाला आला आणि त्यानंतर एमआयएमने उमेदवारी अर्ज मागे घेतला मात्र शहरातील वातावरण कलुषित होण्याचा धोका अद्यापही टाळलेला नाही.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे चित्र 29 तारखेला अखेर स्पष्ट झालेले तब्बल 11 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आता 25 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले त्यामुळे वीस उमेदवार सध्या शिर्डीतून निवडणूक लढवत आहेत.


शेअर करा