कोपरगावात चार मुलांचा बाप असलेल्या नराधमाची नियत बदलली आणि.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून चार मुलांचा बाप असलेल्या एका विकृत व्यक्तीने शहरात अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केलेला आहे. 42 वर्षीय आरोपीने हा प्रकार केला त्यानंतर त्याला अवघ्या काही तासांच्या आत जेरबंद करण्यात आले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , तौसीफ बागवान ( वय 42 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून नोव्हेंबर 2023 पासून तो अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य करत होता. आरोपी आणि मुलीच्या घरच्यांची ओळख होती त्याचा गैरफायदा घेत त्याने गैरकृत्य करण्यास सुरुवात केली. मुलीला त्यानंतर सातत्याने तो त्रास देऊ लागला म्हणून अखेर मुलीने आईला ही बाब सांगितली.

मुलीच्या नातेवाईकांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यानंतर 15 एप्रिलला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झालेला होता मात्र बीड जिल्ह्यातून अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा