टपरीच्या आड सुरू होता ‘ भलताच ‘ प्रकार,  तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून तोफखाना पोलिसांनी आपल्या हद्दीतील अवैध व्यवसायांबद्दल आक्रमक धोरण अवलंबले असून घरगुती वापराच्या गॅसच्या टाकीतून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यवसायावर कारवाई करत तब्बल 34 टाक्या आणि गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त केलेले आहे.18 तारखेला ही कारवाई कोठला परिसरात करण्यात आली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अन्सार अली सय्यद ( वय 20 वर्ष राहणार मुकुंदनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एका टपरीच्या आडोशाला तो गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षकआनंद कोकरे यांना मिळालेली होती. तोफखाना पोलिसांनी त्यानंतर तात्काळ कारवाई केली आणि 34 गॅस टाक्यासहित सुमारे 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


शेअर करा