उत्कर्षा रूपवतेंच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपुरात

शेअर करा

शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवारी 4 मे रोजी मिनी स्टेडियम,  कोर्ट रोड, श्रीरामपूर येथे दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या संयोजकांच्या वतीने देण्यात आलेली असून सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उत्कर्षाताई रुपवते यांना ‘ प्रेशर कुकर असे चिन्ह जाहीर झालेले आहे. सद्य परिस्थितीत त्या मतदारसंघ पिंजून काढत मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत . 

माजी मंत्री दादासाहेब रुपवते , प्रेमानंद रूपवते, माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन रुपवते या राजकारणात सक्रिय असून राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या देखील राहिलेल्या आहेत. अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले असून शिर्डी मतदारसंघात महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे तर शिर्डी मतदार संघात बौद्ध बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्याचाही मोठा फायदा रुपवते यांना होऊ शकतो.


शेअर करा