नरेंद्र मोदी यांच्या भाषणांना जनता कंटाळली , राहुल गांधी तब्बल इतक्या टक्क्यांनी पुढे.. 

शेअर करा

देशातील गोदी मीडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिमामंडळ करण्यात 24 तास व्यस्त असून राहुल गांधी आणि काँग्रेस यांना या गोदी मीडियाकडून अजिबातही प्रसिद्धी दिली जात नाही  आणि जर दिलीच तर त्यामधून काँग्रेसचेच चारित्र्यहनन करण्याचे काम गोदी मीडिया गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. या पार्श्वभूमीवर एक अहवाल प्रसिद्ध झालेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधी यांचे यूट्यूब चैनल राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये लोकप्रिय असल्याचे अहवालातून समोर आलेले आहे. 

सहा एप्रिलपासून 12 एप्रिलपर्यंत आठवड्यामधील राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या youtube चॅनेलला मिळालेल्या दर्शकांची संख्या याविषयीची माहिती या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेली असून 18 एप्रिलला हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये एकूण दर्शकांपैकी एकतीस टक्के दर्शक हे राहुल गांधी यांचे यूट्यूब चैनल पाहतात तर नरेंद्र मोदी यांचे यूट्यूब चैनल अवघे 9% दर्शक पाहतात असे म्हटलेले आहे. 

राहुल गांधी यांचे युट्युब चॅनेल पाच कोटी 80 लाख जणांनी पाहिले तर दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे युट्युब चॅनेल असून तब्बल दोन कोटी 80 लाख दर्शक यांनी हे व्हिडिओज पाहिलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर क्रमांकावर काँग्रेसचे अधिकृत youtube चॅनेल इंडियन नॅशनल काँग्रेस असून दोन कोटी साठ लाख लोकांनी हे चॅनेल पाहिले तर अक्षरश: चौथ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यूट्यूब चैनल पाहिले गेलेले असून अवघे एक कोटी पन्नास लाख दर्शक या चॅनलला लाभलेले आहेत .


शेअर करा