‘ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय डोळे बंद कर ‘ , तिने डोळे बंद करताच अचानक..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात समोर आलेले असून ‘ तुझ्यासाठी गिफ्ट आणलेले आहे डोळे बंद कर पट्टी बांध आणि गिफ्ट काय आहे ते ओळख ‘ असे सांगत एका माथेकरू प्रियकराने प्रेयसीचा गळा चाकूने चिरलेला आहे. ती जीवाच्या आकांताने बाहेर पडली त्याच वेळी आरोपीने स्वतःवर देखील वार करून घेतले. परतवाडा येथील एका लॉजमध्ये सोमवारी दुपारी ही घटना घडली असून दोनही जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

उपलब्ध माहितीनुसार, संकेत दिनेश मांडवकर ( वय 22 राहणार आमनेर तालुका वरुड ) असे आरोपी प्रियकराचे नाव असून पीडित तरुणी हीचे वय 19 वर्षे आहे . ती अंजनगाव सुर्वी तालुक्यातील मुळची रहिवासी आहे. सोशल मीडियावर त्यांची ओळख झालेली होती त्यानंतर त्यांच्या या मैत्रीला संशयाचे ग्रहण लागले म्हणून आरोपीने तिला अमरावती येथून परतवाडा येथे बोलावून आणलेले होते यावेळी त्याने हा प्रकार केला.

संकेतने तिच्यासाठी खास अंगठी भेट देण्यासाठी खरेदी केली होती. तर तिने देखील त्याच्यासाठी भेटवस्तू आणली होती. परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात असणाऱ्या टेकाडे कॉम्प्लेक्स येथील एका लॉजमधील खोलीत संकेतने तिला नेले होते. यावेळी तिच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या युवकाचे सतत मेसेज येत होते. ती आपल्यासह आणखी दुसऱ्या मुलासोबत देखील असल्याचा संशय संकेतला आला. त्यामुळे प्रचंड संतापला. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावली त्यानंतर अचानक चाकूने तिच्या गळ्यावर आणि गालावर वार केले अन यानंतर त्याने स्वतःला देखील चाकू मारून जखमी करून घेतले.

युवतीचा ओरडण्याचा आवाज येताच लॉज मालकाने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळतात परतवाडा पोलिसांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या संकेत मांडवकर याला ताब्यात घेऊन युवतीने दिलेल्या बयानावरून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 307, 309 अन्वये गुन्हा दाखल केला. त्या युतीचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय आल्याने संकेतने तिच्यावर चाकूने वार केलाअसल्याचे माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.


शेअर करा