नवरा बायकोच्या वादात संघाच्या व्यक्तीला लुडबुड महागात , बसमधून उतरवलं अन..

शेअर करा

महाराष्ट्रात पनवेल येथे संविधानाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यास मारहाण करण्याचे प्रकरण समोर आलेले असताना असाच काहीसा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे याआधी घडलेला होता मात्र वेगळ्या प्रकरणातून. एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर हा व्यक्ती वर्धा जिल्हा संघचालक असल्याची माहिती समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जेठानंद राजपूत असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक म्हणून काम करतात . वर्धावरून बसने प्रवास करत असताना बसमधल्या काही युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर त्यांना बसमधून खाली उतरवले आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. सदर प्रकार समोर आल्यानंतर काही संतप्त संघाच्या व्यक्तींनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपीवर अटकेची मागणी केलेली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असून एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे.

जेठानंद राजपूत हे वर्धावरून हिंगणघाटला एका बसने प्रवास करत होते. तिथे एका दांपत्याचा वाद सुरू होता त्यावेळी जेठानंद राजपूत मध्यस्थी करण्यासाठी गेले म्हणून संबंधित युवकाने त्यांच्यासोबत वाद घालायला सुरू केले. हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर बस थांबवून जेठानंद राजपूत यांना खाली उतरवून आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनेचा आढावा घेत आरोपीला अटक केलेली आहे.


शेअर करा