पडक्या शाळेत प्रेमीयुगुल मयत अवस्थेत आढळलं

शेअर करा

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका पडक्या शाळेत एका जोडप्याने आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून यातील मयत तरुणीचा अवघ्या दोन दिवसांपूर्वीच विवाह झालेला होता.

पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील एका पडक्या शाळेमध्ये दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जितेंद्र राजू राठोड ( वय 19 ) आणि साक्षी सोमनाथ भोई ( वय 18 राहणार वरखेडी नाका परिसर पाचोरा ) असे मयत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

दोघांचे एकमेकांवर प्रेम होते मात्र कुटुंबीयांकडून दोघांच्या लग्नाला मोठा विरोध होत होता त्यानंतर कुटुंबीयांनी अखेर साक्षी हिचा विवाह दोन दिवसांपूर्वी लावून दिला त्यानंतर ती माहेरी आलेली होती. जितेंद्र आणि साक्षी यांच्यात लग्नानंतर फोनवरती संभाषण झाले आणि त्यानंतर साक्षी ही माहेरी निघून आली.

घटना घडली त्याआधी जितेंद्र आणि साक्षी यांनी एकमेकांना फोन करून संपर्क केला आणि घराच्या मागे असलेल्या पडक्या शाळेत भेटायचे ठरले. दोघेही तिथे आले आणि त्यानंतर त्यांनी दोरीने गळफास घेत आयुष्य संपवले. साक्षीच्या भावाला मध्यरात्री जाग आली त्यावेळी घरात ती नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला त्यावेळी दोघांचेही मृतदेह अखेर आढळून आलेले आहेत.


शेअर करा