नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार , राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की..

शेअर करा

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास तथा महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी जवळील सावळी विहीर इथे पशुपालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे अशी माहिती दिलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय महाविद्यालय असून त्यासाठी राज्य सरकारने सुमारे 492 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे असे देखील ते पुढे म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झालेल्या या निर्णयाचा फायदा शेतकरी , विद्यार्थी , पशुपालक यांना होणार असून उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय राहणार आहे. 492 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने नगर जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे असे देखील ते म्हणाले आहेत.

आज रोजी महाराष्ट्रात पशुवैद्यकीय पदवीसाठी केवळ नागपूर परभणी सातारा उदगीर आणि मुंबई याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असून खाजगी महाविद्यालय खाजगी पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय अद्यापपर्यंत महाराष्ट्रात नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना प्रचंड स्पर्धेचा सामना करावा लागतो . त्या दृष्टीने हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.


शेअर करा