नोटांना पावडर लावून पाठवलं , पोलिसदादा आले एसीबीच्या टप्प्यात

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या जालन्यात समोर आलेला असून तक्रारदार व्यक्तीवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा लवकर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 5000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पोलीस ठाण्यात सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उदलसिंग मानसिंग जारवाल ( वय 53 राहणार यशवंत नगर अंबड रोड जालना ) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव असून तक्रारदार व्यक्ती यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास उदय उदलसिंग यांच्याकडे होता. तुमच्या गुन्हयाचा तपास लवकरात लवकर करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतो असे सांगत त्यासाठी पाच हजार रुपयांची लाच द्यावी लागेल असे उदलसिंग यांनी म्हटलेले होते.

तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच त्यानंतर सापळा लावलेला होता . तक्रारदाराला नोटाला पावडर लावून पाठवण्यात आले त्यावेळी जारवाल यांनी पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने तात्काळ ॲक्शन घेत त्यांना ताब्यात घेतलेले असून पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बडवे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.


शेअर करा