अन पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा , मोरे दादा आले एसीबीच्या टप्प्यात

शेअर करा

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महसूल आणि पोलिस विभागात समोर येत असून असेच आणखीन एक नवीन प्रकरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस स्टेशन इथे समोर आलेले आहे . एका पोलीस हवालदाराला तीस हजार रुपये लाचेचा स्वीकार करताना पकडण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , संतोष अर्जुन मोरे असे या पोलीस हवालदाराचे नाव असून सध्या तो शहापूर पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे नोकरीला आहे. तक्रारदार व्यक्ती यांच्यावर शहापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल असून त्यांना मदत करण्यासाठी आरोपीने 45 वर्षीय आरोपीने तक्रारदार यांना 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती . तडजोड करून अखेर त्यांचा तीस हजार रुपये असा सौदा देखील ठरलेला होता.

तक्रारदार व्यक्ती यांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबरवर फोन करून या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर शहापूर पोलीस स्टेशनच्या आवारात सापळा रचण्यात आला. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली असून शहापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.


शेअर करा