शिर्डीतून किडनॅप करून केडगावात डांबलं , तोफखाना पोलिसांनी केली सुटका

शेअर करा

नगर शहराजवळ एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आर्थिक व्यवहारात आई-वडील आणि पुतण्याचे शिर्डी येथून अपहरण करून केडगाव बायपास परिसरात त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे. तोफखाना पोलिसांनी अखेर या कुटुंबाची सोमवारी संध्याकाळी सुटका केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अजय बाळासाहेब जगताप ( राहणार भिस्तबाग सावेडी ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. माधव उर्फ मनीष ठुबे ( राहणार केडगाव ) आणि अंतू वारुळे ( राहणार वारूळवाडी तालुका नगर ), दत्ता हजारे , दत्ता भगत आणि एका जिमचा ट्रेलर आणि एक अनोळखी इसम असे सहा जण या प्रकरणात आरोपी आहेत.

आर्थिक व्यवहारात वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचे आई वडील आणि चुलतभाऊ या तीन जणांना शुक्रवारी 13 तारखेला शिर्डी येथील एका हॉटेलमधून पळवून आणले आणि त्यानंतर केडगाव येथील बायपास परिसरात डांबून ठेवलेले होते. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव यांनी तात्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर कारवाई करत कुटुंबीयांची सुटका करण्यात आलेली आहे.


शेअर करा