भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा , इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आलेला असून इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर सतत संपर्कात राहिल्यानंतर आरोपीने एका तरुणीसोबत प्रेमाचा बनाव केला आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला . पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने त्या तिच्यासोबत जो काही प्रकार केला तो अत्यंत धक्कादायक होता असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार , संदीप भगवान दोंदे असे मुख्य संशयित व्यक्तीचे नाव असून विशेष म्हणजे तो भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा आहे. तक्रारदार महिला डॉक्टर असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तिने आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे.

पीडित फिर्यादी महिला आणि संशयित संदीप यांच्यात जानेवारी महिन्यात इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांना मोबाईल नंबर शेअर करण्यात आल्यानंतर ते संपर्कात देखील राहू लागले. फिर्यादी महिला ही आपल्या प्रेमात पडलेली आहे हे लक्षात आल्यानंतर आरोपी एक दिवस तिला तिच्या घरी भेटण्यासाठी आला.

संशयित असलेला संदीप याने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक जवळीक केली आणि दमदाटी करत तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले असे फिर्यादीचे म्हणणे असून ऑगस्ट महिन्यामध्ये पीडित महिलेला दिवस गेल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात देखील केला त्यानंतर देखील आरोपीने पुन्हा तिच्यासोबत असाच प्रकार केला आणि पुन्हा तिला दिवस गेलेले असल्याकारणाने अखेर तिने संशयित संदीप याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा