‘ ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी ‘ , आरोपींची पद्धत ऐकून पोलिसही चकीत

शेअर करा

आत्तापर्यंत आपण फसवणुकीचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहिलेले असतील मात्र बिहारमधील या फसवणुकीच्या प्रकारानंतर आपण डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. बिहारच्या नावदा जिल्ह्यातील हे प्रकरण असून ‘ ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी ‘ या नावाने फसवणूक करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ज्या महिलांना मुले होत नाहीत त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना गर्भवती करा आणि ऑनलाईन पैसे कमवा असे आमिष दाखवत आरोपींनी अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढलेले होते. 

आरोपींनी या तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी ही नवीन कल्पना आणलेली होती . ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना प्रेग्नेंट करायचे आहे. जर त्या प्रेग्नेंट झाल्या तर तुम्हाला लाखो रुपये दिले जातील असे सांगत आठ जणांची टोळी फोन करून या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यानंतर नोंदणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम मागितली जायची. 

आरोपी टोळीने अनेक जणांना आतापर्यंत साधारण पाच हजार रुपयांपासून वीस हजार रुपयापर्यंत गंडा घातलेला असून महिलांना प्रेग्नेंट करून पैसे कमवण्याची ही कल्पना ऐकून पोलीस देखील हैराण झालेले आहेत. सर्वात प्रथम नोंदणी केली त्यावेळी तरुणांना 799 भरावे लागले आणि त्यानंतर सुरक्षेच्या नावाखाली तुम्हाला काही आजार होणार नाही यासाठी पाच ते वीस हजार रुपये आकारले जायचे . फसवणुकीचा हा अद्भुत प्रकार ऐकून पोलीसही चकित झाले. 

नावदा जिल्ह्यातील गुरमा इथे राहणाऱ्या आरोपींना एका घरातून ताब्यात घेण्यात आलेले असून राजेश कुमार , प्रभात कुमार वर्मा , कवींद्र , प्रसाद कुमार , गोपालदास आणि अनिल कुमार अजय कुमार आणि लक्ष्मण कुमार अशी आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी आरोपींकडून तब्बल नऊ मोबाईल आणि एक प्रिंटर ताब्यात घेतला आहे . पोलिसांनी आतापर्यंत या टोळीने काय काय कारनामे केलेले आहेत याच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.


शेअर करा