मध्यमवर्गीयांचा शास्तीमाफीला प्रतिसाद पण मोठ्यांचा ठेंगा , आयुक्तसाहेब कारवाई कधी ? 

शेअर करा

अहमदनगर महापालिकेच्या थकीत कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी करदात्यांसाठी 75 टक्के शास्तीमाफी दिलेली होती .शास्ती माफीचा मध्यमवर्गीय थकबाकीदारांनी काही प्रमाणात फायदा घेतला मात्र शहरातील टोलेजंग आणि बड्या थकबाकीदारांनी मात्र कर भरण्याकडे सपशेल पाठ फिरवलेली आहे. 

महापालिकेने मालमत्ता धारकांना 30 नोव्हेंबर पासून 9 डिसेंबर पर्यंत शास्तीमध्ये 75 टक्के माफी जाहीर केलेली होती त्या योजनेचा सुमारे 4413 लोकांनी लाभ घेतला असून महापालिकेकडे सहा कोटी 70 लाख रुपयांचा भरणा करण्यात आलेला आहे मात्र तरी देखील म्हणावी अशी थकबाकी वसूल झालेली नाही. 

सुमारे एक कोटींच्या पुढे थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांची संख्या 20 असून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे आता थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे . महापालिकेचा सर्वाधिक कर हा मोठ्या मालमत्ता धारकांनीच थकवलेला असून त्यामध्ये शिक्षण संस्था , हॉटेल व्यावसायिक , कंपन्या यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. गोरगरीब नागरिक आणि मध्यमवर्गीय कारवाईला घाबरून पैसे भरून टाकतात मात्र धनाढ्य व्यक्तींकडे जाण्यास महापालिका अधिकारी देखील कुचराई करतात त्यामुळे असे प्रकार पाहायला मिळत आहेत. 


शेअर करा