धक्कादायक..’ त्या ‘ बाबाला श्रद्धांजली म्हणून चक्क रेव्ह पार्टी 

शेअर करा

31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी चक्क एका ठिकाणी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . पोलिसांनी या रेव्ह पार्टीत पोहोचून अमली पदार्थाची विक्री आणि सेवन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई करत वडवली येथील खाडी किनाऱ्यावर छापा टाकला होता . कारवाईच्या दरम्यान 90 पुरुष आणि पाच महिला ताब्यात घेण्यात आलेले होते . धक्कादायक बाब म्हणजे ही रेव पार्टी चक्क एका बाबाला श्रद्धांजली मिळावी म्हणून आयोजित करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे. 

नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. जुन्या 2023 वर्षाला निरोप देऊन नव्या 2024 वर्षाची स्वागत करायचे म्हणून ही पार्टी वडवली इथे खाडीच्या किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेली होती .पार्टीमध्ये दोन जण अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही छापामारी करण्यात आली . 

छापा टाकण्यात आलेल्या या पार्टीत 90 तरुण आणि पाच तरुणी सहभागी होत्या. अमली पदार्थाचे सेवन करून डीजेच्या तालावर हे सर्व अर्धनग्न अवस्थेत थिरकत होते . पोलिसांनी तिथे झडती घेतली त्यावेळी चरस , गांजा , बियर,  वाइन , विस्की, काही गोळ्या आणि मलम आढळून आले . पोलिसांनी त्यानंतर आयोजकांना ताब्यात घेतलेले आहे. घटनास्थळावरून गांजा पिण्याचे साहित्य , डीजे मशीन आणि 29 दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. 


शेअर करा