मुलांसमोरच पतीकडून ‘ नको ती ‘ मागणी , श्रीरामपूरमध्ये खुनी थरार 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून श्रीरामपूर इथे आपल्या नवऱ्याचा पायरीवरून पाय घसरला आणि पडून मृत्यू झाला असा बनाव एका महिलेने रचलेला होता मात्र पोलीस तपासात पतीच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. आरोपी महिलेला शहर श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संजय गवजी भोसले ( वय 40 वर्ष राहणार अतिथी कॉलनी वार्ड नंबर एक ) हे राहत्या घराच्या पायरीवरून घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मयत व्यक्तीच्या डोक्यात झालेल्या जखमा बाबत डॉक्टरांकडून माहिती घेण्यात आली त्यावेळी या जखमा संशयास्पद असल्याचे दिसून आले. 

मयत व्यक्ती याची पत्नी संगीता संजय भोसले ( वय 38 राहणार अतिथी कॉलनी वॉर्ड नंबर एक ) हिला पोलिसांनी अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यावर तात्काळ ताब्यात घेतले आणि तिच्याकडे सखोल चौकशी सुरू केली त्यावेळी तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अखेर नवरा सतत दारू पिऊन त्रास देत असल्याकारणाने आपण त्याचा खून केलेला आहे अशी माहिती दिली . नवरा हा मुलांच्या समोरच सतत शरीरसंबंधाची मागणी करायचा त्याला नकार दिल्यानंतर मला शिवीगाळ करायचा , असे देखील तिने सांगितले आहे . 

आरोपी महिलेच्या म्हणण्याप्रमाणे , 31 डिसेंबर रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असल्याकारणाने पतीने मोठ्या प्रमाणात दारू पिलेली होती आणि मुलांच्या समोरच पुन्हा नको ती मागणी करायला लागला. पहाटे पावणे सहाच्या सुमाराला शरीर संबंधाची मागणी त्यांनी केली आणि मी नकार दिल्यानंतर माझ्यासोबत भांडण केले.  नेहमीच्या भांडणाला कंटाळून पती लघुशंकेसाठी बाहेर व्हराड्यात उभा असताना मी त्यांना ढकलले आणि ते खाली पडले तेव्हा त्यांच्या कामाच्या पिशवीतील टॉमीसारखा रॉड काढून त्यांच्या डोक्यात वार केले त्यामध्ये त्यांचे डोके फुटून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला असे म्हटलेले आहे. आरोपी महिलेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . 


शेअर करा