मराठा बांधवांचा ‘ गनिमी कावा ‘ केंद्राला महागात ? , मतपत्रिकेवर निवडणूक होण्याची शक्यता

शेअर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्र सरकारला झटका देण्याच्या उद्देशाने मराठा बांधवांकडून प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेतला जात आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आल्यानंतर करायचे तरी काय ? यासाठी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेले आहे. 

मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज प्रत्येक मतदारसंघात दाखल करण्यात आले तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल यासंदर्भात मनुष्यबळ मतपत्रिकांची हाताळणी आणि त्यांची सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन करावे असा मजकूर या पत्रात आहे . अनेक ग्रामपंचायतींनी अशा स्वरूपाचे निर्णय घेतलेले असून प्रत्यक्षात हे निर्णय अंमलात आले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची वेळ निवडणूक आयोगावर येणार आहे. अनेक राजकीय पक्ष देखील मतपत्रिकेवर निवडणुकीच्या समर्थनात आहेत त्यामुळे मराठा बांधवांचे हे पाऊल निश्चितच केंद्राला झटका देणारे ठरणार आहे. 

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान 1000 उमेदवार उभे राहिले तर निवडणुकाच घेता येऊ नये अशी रणनीती ठरविण्यात आलेली असून या मोहिमेला मिशन 1000 असे नाव देण्यात आलेले आहे . मनोज जरांगे पाटील याप्रकरणी काय भूमिका घेतील यावर आंदोलनाची दिशा ठरणार असून सध्याची मतदान यंत्रे त्यामुळे उपयोगी पडणार नाही . मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची ठरली तर मतपेट्या ठेवण्याच्या जागेचाही प्रश्न निर्माण होणार असून निवडणूक आयोगाने या संदर्भात मार्गदर्शन करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे. 


शेअर करा