इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करायचंय ? वाचा महत्वाची अपडेट

शेअर करा

इलेक्ट्रॉनिक वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या फास्टर अडोप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल व्हेईकल या योजनेला कोणत्याही पद्धतीची मुदतवाढ दिली जाणार नाही असा खुलासा केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे. 

31 मार्च रोजी या योजनेची मुदत संपणार असून सोशल मीडियावर अनेक पोस्ट या संदर्भात व्हायरल झालेल्या होत्या त्यामध्ये 31 जुलैपर्यंत ही वाढ देण्यात येणार आहे असे म्हटलेले होते मात्र या बातम्या तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले आहे. 

स्पष्टीकरणांमध्ये म्हटले आहे की , ‘ योजना 31 मार्च 2024 पर्यंत अथवा उपलब्ध केलेला निधी संपेपर्यंतच चालणार असून त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येणार आहे . त्या योजनेला कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आणि अतिरिक्त तरतूद देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली नाही . ‘ 


शेअर करा