कोपरगावात स्वतःच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले अन.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून स्वतःच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार ब्लेडने वार करत एका 35 वर्षीय विवाहित तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. कोपरगाव शहरातील संजयनगर परिसरात ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संजय लक्ष्‍मण आल्हाट ( राहणार संजय नगर कोपरगाव ) असे मयत तरुणाचे नाव असून 35 वर्षेय विवाहित तरुण संजय याने सात मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वतःच्या पोटावर गळ्यावर आणि धारदार शस्त्राने वार केले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवलेली होती. 

संजय याने हा प्रकार का केला याचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा