भाजप सरकार वसुली सरकार , काँग्रेसकडून जुनी बातमी शेअर करून.. 

शेअर करा

निवडणूक रोख्यासंदर्भात एसबीआयने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप सरकारकडून वसुली करण्यात आलेली असून कोट्यवधींचे प्रोजेक्ट  अक्षरशः देणग्या मिळाल्यानंतर काही दिवसातच संबंधित कंपन्यांच्या घशात घालण्यात आल्याचा खुलासा करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर एक पोस्ट लिहिलेली असून त्यामध्ये तत्कालीन बातम्यांचा देखील संदर्भ जोडत भाजपवर निशाणा साधलेला आहे. काँग्रेसच्या पोस्टमध्ये , ‘ वेदांत कंपनीने भाजपला 16 एप्रिल 2019 निवडणूक रोख्यांद्वारे 39.66 कोटी रुपयांची देणगी दिली, आणि 9 दिवसातच म्हणजे 25 एप्रिल 2019 रोजी राजस्थानमधला 12 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प वेंदात कंपनीला दिला गेला. भाजप सरकार, वसुली सरकार. ‘ असे म्हटले आहे . 


शेअर करा