मराठा बांधवांची चिंता वाढवणारी बातमी ,  एकनाथ शिंदे म्हणाले की अजून.. 

शेअर करा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांसाठी एक धक्कादायक बातमी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ कुणबी जात प्रमाणपत्र सगे सोयऱ्यांना दिली जावेत यासाठी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेवर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आणखीन चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे ‘ असे म्हटलेले आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले की , ‘ सगे सोयरे अधिसूचनेवर सुमारे आठ लाख 47 हजार हरकती आलेल्या असून अद्याप चार लाखांपेक्षा अधिक हरकतींची छाननी बाकी आहे त्यानंतर ही अधिसूचना जाहीर होईल . मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत त्यांनी यापुढे देखील सहकार्य करावे ‘ असे ते म्हणाले. 

गेल्या सहा महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना त्यांच्या कुणबी सगेसोयऱ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी त्यांची मुख्य मागणी आहे. सरकारने त्या संदर्भात अध्यादेश तर काढला मात्र त्याचे कायद्यात रूपांतर केलेले नाही त्यामुळे आजही मराठा बांधवांचा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी संघर्ष सुरू आहे. 


शेअर करा