गनिमी काव्याचे ‘ जबरदस्त प्लॅनिंग ‘, पुण्यातही मराठा बांधवांचा निर्धार

शेअर करा

मराठा बांधवांकडून सध्या गनिमी काव्याचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू असून सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय समाजाला मान्य नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी दाखल करण्यात येणार आहेत त्यामुळे ईव्हीएमवर निवडणुका घेणे अवघड होण्याची चिन्हे आहेत. 

मराठा बांधवांच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघात देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असले तरी मराठा समाजाकडून देखील मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्यात येणार असल्याने ईव्हीएमवर निवडणूक होणे अवघड दिसते आहे. 

राज्य सरकारने मराठा बांधवांना केवळ गाजरे दाखवली आणि समाजाची फसवणूक केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा बांधवांनी राज्य सरकारला हिसका दाखवायचा आहे प्रत्येक गावातून दोन उमेदवार निवडून आणण्याचे देखील निर्धार यावेळी दोन उमेदवार उभे करण्याचा देखील निर्णय यावेळी घेण्यात आलेला असून मराठा बांधवांच्या या निर्णयामुळे सद्य परिस्थितीत भाजपची मात्र डोकेदुखी वाढलेली आहे . 


शेअर करा