मेहुण्याने घेऊन दिलेली बैलजोडी निघाली बिनकामाची , निवृत्त पोलिसालाच फसवलं.. 

शेअर करा

स्वतःच्या नात्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला फसवण्याचा प्रकार समोर आलेला असून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सख्ख्या मेहुण्याच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे. शेती मशागतीसाठी घेतलेली बैल जोडी परस्पर विकून टाकली आणि मोटरसायकल देखील परत दिली नाही त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुरज शेळहळकर ( राहणार उदगीर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असलेले त्याचे दाजी देवराम दगडू वडमारे ( वय 67 राहणार बार्शी सध्या राहणार मुंबई ) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. 

आरोपीने फिर्यादी यांना शेती मशागतीसाठी 2019 मध्ये एक लाख दहा हजार रुपयांना एक बैल जोडी घेऊन दिलेली होती. बैलजोडी शेतीसाठी योग्य वाटली नाही म्हणून पुन्हा विकून टाकण्यात आली मात्र त्याचे एक लाख रुपये फिर्यादी यांस देण्यात आले नाही आणि 80 हजार रुपयांची मोटरसायकल आरोपी दोन वर्षांसाठी घेऊन जातो म्हणून गेला ती देखील परत दिली नाही . पाठपुरावा करून थकल्यानंतर अखेर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत मेव्हण्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. 


शेअर करा