राहुरीतील ‘ त्या ‘ प्रकरणात तलाठी भाऊसाहेबाला झाली शिक्षा

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरीत समोर आलेली होती. राहुरी तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला पावणे दोन वर्ष कारावास आणि चार हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा राहुरी न्यायालयाने सुनावलेली आहे . विशेष बाब म्हणजे आरोपी व्यक्ती हा महसूल खात्यात तलाठी पदावर कार्यरत आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संदीप नवनाथ नेहरकर असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपीने 19 ऑगस्ट 2019 रोजी महिलेचा विनयभंग केलेला होता. राहुरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षा सुनावण्याआधी खटल्या दरम्यान सरकारी पक्षाकडून पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील एडवोकेट रवींद्र गागरे यांनी फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद केल्यानंतर न्यायाधीश आसावरी वाडकर यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे


शेअर करा