‘ व्हाट्सअप मेसेज ‘ प्रकरणी दांपत्याकडून ब्लॅकमेल, पुण्यात तरुणाने अखेर.. 

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून ‘ माझ्या पत्नीला व्हाट्सअप मेसेज का केला तुझी पोलिसात तक्रार करतो ‘ अशी धमकी दिल्यानंतर धमकी देत एका दाम्पत्याने तरुणाला तेरा लाख रुपयांना गंडा घातला आणि त्यानंतर ब्लॅकमेल सुरू असल्याकारणाने हतबल झालेल्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून अखेर आत्महत्या केली. 

उपलब्ध माहितीनुसार , अशोक जोशी ( वय 38 वर्ष राहणार नारायण पेठ ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून सदर प्रकरणात वैष्णवी गणेश चव्हाण ( वय छत्तीस वर्ष ) आणि गणेश चव्हाण ( वय 28 वर्ष दोघेही राहणार खैरेवाडी भारतीय विद्यापीठ रस्ता ) अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत. 

अशोक जोशी हे नर्हे परिसरात रहायला असताना 13 तारखेला त्यांनी वैष्णवी हिला व्हाट्सअप मेसेज केला त्यानंतर या दाम्पत्याने संगनमत करून अशोक यास गाठले आणि पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले . 

21 फेब्रुवारीपर्यंत आरोपींनी अशोक यांच्याकडून 13 लाख रुपये उकळले मात्र तरीही पैशाची भूक भागत नसल्याने आरोपी यांनी अशोक यांना छळण्यास सुरू केले. हतबल झालेले अशोक यांनी 21 तारखेला नारायण पेठ येथील कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा