अन्यथा 26 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार , शेतकऱ्याचा इशारा

शेअर करा

शेतीला विद्युत जोडणी देण्यात सतत टाळाटाळ करत असलेल्या महावितरणच्या विरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखेर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , श्रीधर लालजी जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून ते राहुरी तालुक्यातील शेनवडगाव येथील रहिवासी आहेत, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली फी भरली मात्र तरी देखील तुम्ही खाजगी पद्धतीने विज जोडणी करून घ्या असा सल्ला त्यांना देण्यात आला . 

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात डीपी आहे तो शेतकरी फिर्यादी व्यक्ती यांना जाधव यांना पोल टाकण्यास मज्जाव करत असून या डीपीवरून विद्युत जोडणी घ्यायची नाही असे धमकावत आहे. जाधव यांनी महावितरणकडे अनेकदा तक्रार केली मात्र त्यांच्या मागणीची कुणी दखल घेतलेली नाही. 

ज्या शेतकऱ्याच्या शेतात सध्या डीपी आहे त्या डीपीवरील लाईन विशेष म्हणजे जाधव यांच्याच शेतातून गेलेली आहे मात्र तरीदेखील जाधव यांना मात्र शेतीला विद्युत जोडणी करण्यास समोरील शेतकरी अटकाव करत आहे . श्रीधर जाधव यांनी अखेर 26 मार्च रोजी साडेअकरा वाजता नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे.


शेअर करा