आमदार निलेश लंके यांचं अखेर ठरलं ,  निर्णय जाहीर करताना डोळ्यात अश्रू..

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून त्यामध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.  कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर निलेश लंके यांनी हा निर्णय घेतलेला असून आपली भूमिका मांडताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.

काय म्हणाले निलेश लंके ? 

मी आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे त्यामुळे अजित पवारांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रवादळात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलंत मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल. चार महिने कमी असताना आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी म्हणालो माझ्या लोकांना विचारू द्या. 

आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल. आपल्याला लढायचे आहे रडायचं नाही अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आपल्याला आता विधानसभा पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आपण आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवत आहोत. 


शेअर करा