‘ थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ? तुमच्या कानात प्रॉब्लेम दिसतोय ‘, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

शेअर करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप हा फार महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. सदर व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे चपलेने थोबाड फोडण्याची इच्छा व्यक्त केली होती अर्थात योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचे दर्शन घेताना पायातील चप्पल काढली नव्हती, असा दावा करत उद्धव ठाकरे असे म्हणाले होते.

संजय राऊत यांनी भुवनेश्वरहून आल्यानंतर मीडिया बोलताना म्हटले , ‘ भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात. तुम्हाला या थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काही तरी प्रॉब्लेम दिसतोय. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत. ज्यांना ही थप्पड सहा वर्षानंतर ऐकायला आली त्यांच्याकडे सर्जन पाठवून देण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला.

योगी आदित्यनाथ यांनाही धमकी आली तेव्हा धमकी देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. मोदींनाही धमक्या येत असतात. त्यामुळे धरपकडी होतात. हे प्रमुख लोकं घटनात्मक पदावर असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे यंत्रणेचं काम आहे. त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे मारण्याची धमकी दिली तर कितीही मोठा माणूस असेल तर कारवाई केली जाते. देशात तालिबानी पद्धतीचं राज्य नाहीये. कायद्याच्या रखवालदारांनी काही कारवाई केली असेल तर त्यात गहजब माजवण्याचं कारण नाही, असंही राऊत म्हणाले.

सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे. सूडाने कारवाया करायला आमच्या हातात सीबीआय ईडी नाही. या देशात कुठे आणि काय सूडाने कारवाया होतात या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक आणि देशातील अनेक लोकं यांच्याविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत. त्याला सूडाच्या कारवाया म्हणतात.

तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सूडाच्या कारवाया करता आणि त्या सूडाच्या कारवायांना कायदेशीर कारवाया म्हणता. महाराष्ट्र धमकीबद्दल कारवाई झाली तर ती सूडाची कारवाई? ती सूडाची असेल तर बिनबूडाची असेल. कारवाई कायदेशीर असते. जर कायदेशीर कारवाई नसेल तर ती न्यायालयात टिकत नाही. अजूनही या देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत. आणि न्यायबुद्धी स्वतंत्र बाण्याने अजूनही न्यायदान करत असते, असंही त्यांनी सांगितलं.


शेअर करा