पुणे हादरले..दोन्ही जावांचा एकमेकींच्या दिरांवर बलात्काराचा आरोप, एकीवर गोठ्यात तर दुसरी लॉजमध्ये

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात राजगड पोलीस ठाण्यात दोन गटातील चार जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व जण नातेवाईक असून एकाच भावकीतील आहेत. सदर प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

एकमेकींच्या नात्याने चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आणि पोलिसही चकित झाले. एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून महिलेच्या म्हणण्यानुसार ही घटना 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान भोर तालुक्यातील पीडित महिलेच्या शेतात घडली आहे. शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यास गेलेल्या या महिलेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केला आणि नंतर दोन सहकाऱ्यांसोबत संगनमत करून गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.भोरमधील महिलेने पहिल्यांदा तक्रार ही तक्रार दिली.

तिची तक्रार दाखल होताच संबंधित आरोपीच्या पत्नीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात असून तिच्या म्हणण्यानुसार कापूरहोळ येथील एका लॉजवर आणि पीडितेच्या राहत्या घरी ऑक्टोबर 2020 पासून 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळोवेळी त्याने जबरदस्तीने बलात्कार केला. पोलिसही ह्या प्रकरणात चक्रावून गेले असून त्यांनी सरसकट चार आरोपीना बेड्या ठोकल्या असून तपास सुरु आहे .


शेअर करा