‘ काय करायचे ते कर ‘ , नगर तालुका पोलिसात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर तालुक्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून भर रस्त्यात टाकलेले चिंचेचे पोते बाजूला उचलण्यास सांगितले मात्र पोते बाजूला करणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणत एका व्यक्तीला धमकी देण्यात आलेली आहे. रविवारी दुपारी ११:०० च्या सुमारास तालुक्यातील चिचोंडी पाटील इथे ही घटना घडलेली असून एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जहांगीर युसुफ मणियार ( राहणार चिचोंडी पाटील तालुका अहमदनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून नगर तालुका पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आजिनाथ बाबासाहेब पाडळकर यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिलेल्या असून फिर्यादी व्यक्ती घरी सकाळी 11:00 च्या सुमारास निघालेले होते. 

आरोपी याने भररस्त्याच्या मध्ये पोते टाकलेले होते त्यामुळे फिर्यादी यास जाण्यास अडचण होत होती म्हणून त्यांनी पोते बाजूला काढून घेण्यास सांगितले याचा आरोपीला राग आला आणि त्याने ‘ काढत नाही तुला काय करायचे ते कर ‘ असे म्हणत फिर्यादी यास धमकी दिली. मी आणखीन अतिक्रमण करेन तुला काय करायचे असेल ते कर , असे म्हणत माझ्या नादाला लागला तर तुला जीवे मारून टाकेल असे देखील तो म्हणाला अशी तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात केलेली आहे. 


शेअर करा