रामकृष्ण हरी वाजवा तुतारी , 13 तारखेला संध्याकाळी तुम्ही दादांना फोन केला तर.. 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सुरू असून श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी इथे भाषणादरम्यान जे काय दादा काका तुमचे आहेत ते तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला फोनला रिचार्ज मारून देतील त्यानंतर तुमचे फोनही उचलणार नाही असे म्हटलेले आहे. निलेश लंके यांनी श्रीगोंदा तालुक्याबद्दल आपल्याला विशेष प्रेम आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा आणि खरातवाडीतील ग्रामस्थांनी मला अंगाखांद्यावर खेळवले आहे असे देखील ते यावेळी म्हणाले. 

निलेश लंके म्हणाले की , ‘ 100% एमआयडीसी आपण इथे आणणार आपण कारण या तालुक्याचा आणि माझा जुना संबंध आहे .या तालुक्यातला माझा जन्म आहे अन याच तालुक्यात माझ्या वडिलांची बरीच सर्व्हिस गेलेली आहे त्यामुळे ज्यावेळेस मी खासदार म्हणून दिल्लीत जाईन ना पहिली विकासाची गंगा श्रीगोंदा तालुक्यातून चालू करेल . 

एकदा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बघा तुमच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवीन. ज्या ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल त्या त्यावेळेस हा निलेश लंके तुमची ढाल म्हणून पुढे राहील. वेळप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची वेळ झाली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवील पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल. 

अमोल कोल्हे साहेब दिल्लीत असल्यानंतर मला काय अडचणी कुठल्या अडचणी ? . अमोल कोल्हे साहेबांचे त्या ठिकाणी पाठबळ असल्यानंतर दिल्लीत सुद्धा हा तुमचा निलेश लंके गरजल्याशिवाय राहणार नाही . आपले चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असून हाच जोश 13 तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे . 


शेअर करा