कोठला हल्ला प्रकरणातील आरोपी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह , झेंडीगेट सोशल क्लबचा दावा 

शेअर करा

व्यवसायातील अंतर्गत स्पर्धेतून नगर शहरातील मंगलगेट परिसरात असलेल्या कोठला इथे एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता त्यात तो थोडक्यात वाचला. घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी झेंडिगेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. 

सरवर शेख असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून व्यवसायातील अंतर्गत वादातून सरवर शेख यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आलेला होता. घटनेतील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत मात्र अद्यापदेखील त्यांना अटक करण्यात आली नाही यावर झेंडिगेट सोशल क्लबच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे . लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. 

झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्यात आलेले असून त्यामध्ये पोलीस गुंडांना आणि सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत .आरोपी शहरात खुलेआम फिरत असून सोशल मीडियावरील प्रोफाइल देखील अपडेट करतात यावरून ते सोशल मीडियावर देखील सक्रिय आहेत मात्र पोलिसांनाच का सापडत नाहीत ? असा देखील प्रश्न झेंडिगेट सोशल क्लबच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे. 


शेअर करा