पोलिसांनी ठोकल्या बेड्या , चांदबिबी महालावर पाळत ठेवून थांबायचा अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर एकांताचा फायदा घेणे दांपत्याला लुटण्याचे प्रकार काही नवीन नाहीत अशीच एक घटना नगर शहरानजीक असलेल्या चांदबिबी महाल परिसरात घडली होती सदर दांपत्याला आरोपीने चाकूचा धाक दाखवत लुटले होते. त्याला नगर तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर आरोपी हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून भरत मच्छिंद्र माळी ( राहणार सय्यद मीर लोणी तालुका आष्टी जिल्हा बीड ) असे त्याचे नाव आहे. प्रवीण गोविंद निटूरकर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे चांदबिबी महालाच्या डोंगरावरील पॉलिहाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिरायला निघालेले असताना आरोपीने त्यांना रस्त्यात अडवली आणि चाकूचा धाक दाखवून दमदाटी करत त्यांच्याकडून मोटारसायकल मोबाईल सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीस हजार रुपयांचा माल चोरून आरोपी आणि त्याचे साथीदार फरार झाले होते.

आपल्या सोबत झालेल्या या प्रकारानंतर नेरूरकर यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन गाठलं अन अज्ञात आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला वेग आणला आणि भरत माळी याला अटक केली. आरोपी बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलीस नाईक भानुदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खिळे यांनी या पथकात महत्त्वाची कामगिरी बजावली.


शेअर करा