‘ राज ठाकरे यांचा हा भोंगा सर्वसामान्यांना… ‘, छगन भुजबळ म्हणाले की ?

शेअर करा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असून राज ठाकरे यांचा हा भोंगा सर्वसामान्यांना परवडणारा नाही तो जनसामान्यांमध्ये तेढ निर्माण करणारा आहे. समाजात तेढ निर्माण झाल्यावर दंगली होतील. त्यावेळेस हे घरात राहून तमाशा पाहात बसतील, अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त औरंगाबाद येथे छगन भुजबळ बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या मागे ईडीची चौकशी लागली होती त्यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली होती मात्र आता तेच राज ठाकरे राज्य सरकारच्या विरोधात बोलत आहेत. ईडी मागे लागल्यानंतर माणूस भरडला जातो मालमत्ता जप्त होते. या कायद्याचा वापर विरोधकांचा काटा काढण्यासाठी केला जात असल्याने ईडी कायदा मागे घ्यावा यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत.

शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या दिवशी एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नागपूरला अनेक वेळा फोन केल्याची पोलिसांची माहिती वृत्तवाहिन्यांवर येत आहे आता त्यांनी नागपूरला कोणाशी संपर्क केला हे मला माहिती नाही मात्र सदावर्ते यांच्या चौकशीतून या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे हळूहळू बाहेर येईल, असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा