निकिता ‘ डायरेक्ट ‘ कोर्टातच आली , केलाय असा कारनामा की ?

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मध्य प्रदेशात भोपाळ इथे समोर आलेली असून लग्नानंतर अवघ्या 72 तासांनंतर सासरच्या मंडळींना बेशुद्ध करून लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या नवरीने कोर्टात सरेंडर केलं आहे. तरुणीने कोर्टात आपली चूक मान्य केली असून पोलिसांनी तिला रिमांडवर पाठवलं आहे.

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या निकिताने भोपाळच्या कार्तिक चौकात राहणाऱ्या सचिन तिवारीसोबत 19 मार्च रोजी चिंतामण मंदिरात लग्न केलं होतं. लग्नाच्या 72 तासानंतर तिने तिवारी कुटुंबाला दुधात नशेचं औषध टाकून बेशुद्ध केलं आणि घरातून रोख, सोन्याचे दागिने घेऊन फरार झाली. या प्रकरणात पोलिसांनी लग्नात सहभागी झालेले मुलीचे खोटे मामा विजय मुळे, भाऊ नारायण आणि ड्रायव्हर यांना पकडून तुरुंगात पाठवलं होतं. यादरम्यान मुख्य आरोपी लुटणाऱ्या नवरीला पकडण्यासाठी पोलीस तिच्या घरी पोहोचले होते मात्र ती फरार झाली होती.

पोलीस तिचा शोध घेत असतानाच निकीता मंगळवारी दुपारी 3 वाजता विजय आणि नारायण या आपल्या नातेवाईकांसह तेथे पोहोचली आणि कोर्टात सरेंडर केलं. त्यानंतरही पोलिसांनीही निकीताला अटक करून न्यायालयाच्या परवानगीनंतर तिला अटक करून 14 एप्रिलपर्यंत रिमांडवर पाठवलं आहे.


शेअर करा