तुमच्या मुलीशी ‘ अशा ‘ परिस्थितीत कोण लग्न करणार ? , आईने त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना धुळे जिल्ह्यात समोर आलेली असून पिंपळनेर परिसरातील वडारवाडी इथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता दुर्दैवाने या मुलीचा यात मृत्यू झालेला असून एका महिलेवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राज सिकलकर असे आरोपी तरुणाचे नाव असून तो वडारवाडी परिसरात राहतो. वडारवाडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला दिवस गेलेले होते. मुलीच्या आईने तिचे पोट दुखू लागल्याने तिला धुळ्याच्या खाजगी रुग्णालयात नेले त्यावेळी तेथील परिचारिका म्हणून काम करणारी प्रमिला पवार हिने मुलीचे लग्न झाले आहे का ? असे विचारले असता आईने नकार दिला.

तुमची मुलगी अशा परिस्थितीत असल्याने तिच्यासोबत कोण लग्न करेल त्यापेक्षा एक काम करा तुम्ही मला दहा हजार रुपये द्या मी माझ्या घरी नेऊन तिचा गर्भपात करते असे प्रमिला पवार हिने मुलीच्या आईला सांगितलेले होते त्यानंतर प्रमिला पवार हिने मुलीची आई आणि तिला हॉस्पिटलमधून तिच्या राहत्या घरी नेले आणि त्यानंतर एक दीड तासाने मुलीला घरी आणून सोडले. काळजीचे काही कारण नाही तिचा गर्भपात झालेला आहे असे त्यावेळी सांगितले मात्र यानंतर या मुलीची प्रकृती आणखीन खालावली. पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.

मयत अल्पवयीन मुलीची आई हिने त्यानंतर पोलिसात दाखल होत गर्भपात करणारी महिला प्रमिला पवार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून आईने मुलीला गर्भवती असल्याची लक्षात आल्यानंतर आरोपीचे नाव विचारले होते त्यावेळी तिने राज सिकलकर याचे नाव सांगितलेले होते त्यामुळे राज शिकलकर याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे तर दुसरी आरोपी प्रमिला पवार ही मात्र अद्याप फरार आहे.


शेअर करा