‘ वार रुकवा दी ना पापा ‘ , ठाकरे गटाच्या जाहिरातीत भाजपची खिल्ली

शेअर करा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून सध्या भाजपवर निशाणा साधणाऱ्या अनेक जाहिराती बनवण्यात आल्या असून ठाकरे गटाच्या या जाहिरातींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे . भाजपच्या जाहिरातींची या जाहिरातीमध्ये खिल्ली उडवण्यात आली असून त्यामध्ये ‘ वार रुकवा दी ना पापा ‘ ही जाहिरात नेटीजन्सला चांगलीच पसंत पडत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवले आणि भारतीयांना परत आणले या संदर्भात ही जाहिरात बनवण्यात आलेली होती.  ज्यावेळी युद्ध सुरू होते त्याचा आधार बनवत गोदी मीडियामध्ये अशा स्वरूपाच्या बातम्या आलेल्या होत्या मात्र त्याचे दोन्ही देशांकडून खंडन आले तरीही खोट्या स्टोऱ्यांवर जाहिरात बनवली असल्याने सोशल मीडियात या जाहिरातीची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली आणि अद्यापही तसाच प्रकार सुरू आहे. 

भाजपच्याच जाहिरातीचा आधार घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही जाहिरात बनवलेली असून त्यामध्ये भाजपच्या सर्व निर्णयांची पोलखोल करण्यात आलेली आहे. वडील आणि मुलगी यांच्यामध्ये भाजपच्या अनेक निर्णयांपैकी एका एका निर्णयाचा आधार घेत वडील आणि मुलगी यांच्यातील संभाषण ‘ वार रुकवा दि ना पापा ‘ असे ही मुलगी वडिलांना उत्तर देते. 

जाहिरातीची थीम साधारण ज्यावेळी ही मुलगी शिक्षणासाठी परदेशात पाठवली त्याआधी वडिलांनी भाजपला मतदान केलेले होते अशी असून भारतात आल्यानंतर सध्या ही मुलगी घरी आहे आणि भाजप सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत त्यावर वडील आणि मुलगी यांच्यात संभाषण होते आणि शेवटी मुलगी वडिलांना भाजपला तुम्हीच मतदान केलेले होते याची आठवण करून देते. 


शेअर करा