पाच वर्षांच्या लॉ डिग्री कोर्सची सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली , आता परीक्षा अखेर.. 

शेअर करा

इयत्ता बारावीनंतर पाच वर्षांच्या लॉ डिग्री कोर्ससाठी दिनांक १८ मे रोजी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. सुरुवातीला चार मे त्यानंतर 18 मे आणि आता अखेर बावीस मे २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. 

महाराष्ट्र सीईटीच्या वेबसाईटवर या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले असून त्यानुसार आता 22/05/2024 रोजी ही परीक्षा होईल.  इयत्ता बारावीनंतर या सीईटी परीक्षेच्या माध्यमातुन पाच वर्षांचा लॉ कोर्स ज्यामध्ये दोन डिग्री समाविष्ट असतात त्यासाठी ही सीईटी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येते. 

दीडशे मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टाईपची सीईटी प्रवेश दिल्यावर त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर मेरीटच्या आधारावर पाच वर्षांचा लॉ कोर्स जिथे आहे त्या लॉ कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते. पाच वर्षांची ही डिग्री मिळाल्यानंतर बार कौन्सिलची परीक्षा दिल्यानंतर डिग्रीधारक व्यक्ती महाराष्ट्र तसेच गोवा येथील न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करू शकतो. 


शेअर करा